ऑत-दा-फ्रान्स
Appearance
ऑत-दा-फ्रान्स प्रदेशाचे नकाशावरील स्थान
| ऑत-दा-फ्रान्स Hauts-de-France | |||
| फ्रान्सचा प्रदेश | |||
| |||
ऑत-दा-फ्रान्सचे फ्रान्स देशामधील स्थान | |||
| देश | |||
| राजधानी | लील | ||
| क्षेत्रफळ | ३१,८१३ चौ. किमी (१२,२८३ चौ. मैल) | ||
| लोकसंख्या | ६०,०९,९७६ | ||
| घनता | १९० /चौ. किमी (४९० /चौ. मैल) | ||
| आय.एस.ओ. ३१६६-२ | FR-HDF | ||
| संकेतस्थळ | www.hautsdefrance.fr | ||
ऑत-दा-फ्रान्स (फ्रेंच: Hauts-de-France
उच्चार ) हा फ्रान्स देशाच्या १८ प्रदेशांपैकी एक प्रशासकीय प्रदेश आहे. फ्रान्समधील सर्वात उत्तरेकडील असलेल्या ह्या प्रदेशाच्या उत्तरेस उत्तर समुद्र, पश्चिमेला इंग्लिश खाडी तर ईशान्येस बेल्जियम देश आहेत. २०१६ साली नोर-पा-द-कॅले व पिकार्दी हे दोन प्रदेश एकत्रित करून ऑत-दा-फ्रान्स प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. सुमारे ६० लाख लोकसंख्या असलेला हा प्रदेश घनदाट लोकवस्तीचा प्रदेश आहे.
विभाग
[संपादन]ऑत-दा-फ्रान्स प्रशासकीय प्रदेश खालील पाच विभागांमध्ये विभागला गेला आहे.
प्रमुख शहरे
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |


